Satara News Updates l गोंदवल्याच्या वाहतूक कोंडीत गुदमरतोय रुग्णांचा जीव l Sakal

सातारा-लातूर महामार्गाच्या कामामुळे गोंदवले बुद्रुक मधील मुख्य चौकात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. मात्र याकडे ना ठेकेदाराने लक्ष आहे ना प्रशासनाचे. परिणामी प्रवाश्यांसह स्थानिक नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. काल पोर्णिमेदिवशी या रस्त्यावर वाहतूक अधिकच वाढलेली असताना रात्री आठच्या सुमारास रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत बराच वेळ अडकून राहिली होती. कोरोना काळात गंभीर रुग्णांच्या जीवावर बेतू नये म्हणून तरी येथील वाहतूक कोंडीकडे गांभीर्याने पाहायला हवे.
(व्हिडिओ : फिरोज तांबोळी, गोंदवले)

#SataraNewsUpdates #SataraLiveUpdates #Satara #AmbulancestuckinTraffic #SataraLaturRoad #MarathiNews #MaharashtraNews #TrafficNews #esakal #SakalMediaGroup