Surprise Me!

नवरीचा हट्ट भारी; नवरदेवाची वरात 'जेसीबी'तून मंडप दारी

2022-02-17 153 Dailymotion

लग्न म्हटल तर नवरदेव मोठ्या थाटा माटात वरात काढत असून घोडा गाडी, महागड्या गाड्या, किंवा लेटेस्ट ट्रेंड म्हणून बैल गाडीतूनही वरात काढतात. एका लग्नात नवऱ्या मुलीनं नवऱ्यासमोर वरातीबाबत एक असा हट्ट धरला की आख्ख गाव बघत राहिलं. नवरी मुलीची भन्नाट कल्पनेतून निर्माण आलेला हट्ट हट्ट पुरविण्यासाठी नवरदेवाने चक्क जेसीबी वर वरात काढली. हे कधी ऐकलं काय? नाही ना मग बघाच....भंडारा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खात गावातील सचिन निरगुळकर आणि प्रतीक्षा या जोडीनं लग्नाचा बार उडवून दिला. त्यानंतर नवऱ्या मुलीला घेऊन सासरी परतले. लग्नानंतर नववधूला सासरच्या घरी आणण्यापूर्वी गावात फिरती वरात काढायची प्रथा आहे. वरात गावात पोहोचली तेव्हा नवरी मुलीने हट्ट धरला की 'मी जेसीबीवरच बसून घरी जाणार'! मग काय नवऱ्यानं नवरीचा हट्ट पुरवण्यासाठी खरच जेसीबी मागवला.नवरदेवाने चक्क जेसीबीवर वरात काढत गावातून डिजेच्या तालावर वाजत गाजत मिरवणुक काढली. सध्या गावात या वरातीचा भलतीच चर्चा आहे

Buy Now on CodeCanyon