Surprise Me!

पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा काढणार; संजय राऊत खवळले

2022-02-19 537 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय नाट्याचा पुढील अंक आज पाहायला मिळाला. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि विनायक राऊतांवर हल्लाबोल केला. त्यानंतर शिवसेना भवनात विनायक राऊत यांनी पत्राकर परिषद घेऊन राणेंवर प्रतिहल्ला केला. याच पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अचानक एन्ट्री घेत मोठी घोषणाच केली आहे. संजय राऊत यांनी आता थेट ईडीला आव्हान दिलं आहे. पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Buy Now on CodeCanyon