Surprise Me!

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात 'पुष्पा'चा बोलबाला; पाहा विजेत्यांची यादी

2022-02-21 24 Dailymotion

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डची वाट सर्वच कलाकार आणि चाहते पाहत असतात. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळा 2022 रविवारी दणक्यात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला आशा पारेख, लारा दत्ता, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी, अहान शेट्टी, सान्या मल्होत्रा आणि रणवीर सिंह यांच्यासह अनेक तारकांनी सहभाग घेतला होता. लकी अलीने त्याच्या 'ओ सनम' या सदाबहार गाण्याचा सुंदर परफॉर्मन्स दिला. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डच्या यंदाच्या वर्षातील विजेत्यांची यादी समोर आलीय. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्कार मिळाला. तर 'मिमी' साठी क्रिती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराची मानकरी ठरली. अभिनेता रणवीर सिंगला '83' मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्री लारा दत्ताला 'बेल बॉटम'साठी सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीत्रा पुरस्कार मिळाला. तर वर्षातील सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाला मिळाला आहे.

Buy Now on CodeCanyon