Surprise Me!

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-बिबट्यामुळे नागरिकांमध्ये दहशत; प्रशासनाचे मौन

2022-02-22 198 Dailymotion

चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर-ऊर्जानगर भागात वाघ-बिबट्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वाघ-बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रशासनाला वारंवार आवाहन करुनही प्रशासनाचे मौन आहे. परंतु आवाहन करुनही प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद नसल्याने सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. गेले सहा महिने या भागात वाघ-बिबट्यामुळे अनेकांचे हल्ले झाले आहेत. वनविभागाच्या हलगर्जीपणाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करत मोर्चा काढला आहे. महाऔष्णिक वीज केंद्रात कंत्राटी कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याने उग्र आंदोलनाला सुरुवात झाली. तर दुर्गापूर परिसरातही १६ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला फरफटत झुडपात नेले. या दोन्ही घटना लक्षात घेता वाघ-बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी या नागरिकांनी मोर्चाद्वारे केली आहे.

Buy Now on CodeCanyon