Surprise Me!

पुण्यात मंत्री वडेट्टीवारांच्या विरोधात घोषणाबाजी; ओबीसी सेलकडून मोर्चा

2022-02-22 19 Dailymotion

ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेस ओबीसी सेलकडून आज पुण्यात मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर केंद्र सरकारच्या विरोधात हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. मोर्चा सुरु असताना अचानक जोरदार राड्यासह तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. आंदोलन सुरू असताना ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील आंदोलनाच्या स्थळी पोहचले. यावेळी संतापलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मृणाल ढोले पाटील यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच गोंधळ उडाला.

Buy Now on CodeCanyon