Surprise Me!

'Jhund' Team in Indian Idol Show: 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार 'झुंड' चित्रपटाची टीम !

2022-03-02 143 Dailymotion

'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. अजय-अतुल हे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतोय.... दर आठवड्याला या स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळे पाहुणेही मंचावर येतात. ह्या आठवड्यात 'झुंड' चित्रपटाचे कलाकार मंचावर येऊन स्पर्धकांना शुभेच्छा देणार आहेत. नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे कलाकार त्यांच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने पोहोचले आहेत... स्पर्धकांचा सुरेल आवाज ऐकण्यासाठी सुरांच्या मंचावर येणार आहेत.<br />

Buy Now on CodeCanyon