Surprise Me!

स्वत: कार चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनातून निघाले

2022-03-08 719 Dailymotion

शिवसेनेच्या नेत्यांवर धाडी टाकून धक्के देण्याची विरोधकांची रणनीती सुरू आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला हजेरी लावली होती. आजारपणातून बरे झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे पहिल्यांदाच ड्रायव्हिंग करताना दिसले. अधिवेशनाला हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री सभागृहाबाहेरही 'अ‍ॅक्शन मोड'वर पाहायला मिळाले. यानिमित्ताने पूर्णपणे फीट असल्याचे दाखवून मुख्यमंत्री पुन्हा मैदानात उतरल्याचे संकेतच मुख्यमंत्र्यांनी दिले. आमदारांना विश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री आज विधानभवनात आल्याचे सांगण्यात आले. स्वतः ड्रायव्हिंग करीत असल्याने पाहून माध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या गाडीभोवती घोळका केला. दोन्ही सभागृहातील कामकाजात सहभागी होऊन ते सव्वापाच वाजता विधानभवनातून निघाले.

Buy Now on CodeCanyon