Surprise Me!

फडणवीसांविरोधात सेनेचा 'लाव रे तो व्हिडीओ'; बाळासाहेब ठाकरेंवर केलेल्या विधानाचा समाचार

2022-03-22 0 Dailymotion

'शिवसेनेने हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारले आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आता शिवसेने 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत उत्तर दिले आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांचा व्हिडीओ दाखवत भाजपवर निशाणा साधला. यावेळी राऊत यांनी फडणवीसांचे इफ्तार पार्टीत मुस्लिम बांधवांसोबत उपास सोडतानाच्या फोटोंचा व्हिडीओ दाखवला.आणि आता फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र मिया म्हणून केला पाहिजे अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

Buy Now on CodeCanyon