Surprise Me!

डोंबिवलीत शिवसेनेकडून गोंधळ; शिवजयंतीला संभाजी महाराजांचा फोटो

2022-03-22 174 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी डोंबिवली शहराच्या विविध भागात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे १५ फलक लावले आहेत. या फलकांवर शिवाजी महाराजांच्या जाही संभाजी महाराजांचा फोटो लावल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील फरक शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांना कळतो की नाही, अशी टीका दिवसभर समाजमाध्यमं आणि डोंबिवलीतील रहिवाशांकडून केली जात होती. "छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातला फरक कळत नाही ते जर शिवसेनेचे शहरप्रमुख असतील तर यासारखे दुर्दैव नाही,” अशी टीका भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. तर, "छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लहान आणि संभाजी महाराजांचा फोटो मोठा झाला आहे, फार मोठी चुकी आमच्याकडून झालेली नाही. नजरचुकीने हा प्रकार घडला आहे. त्याचं कोणीही भांडवल करू नये”.अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिलीये.

Buy Now on CodeCanyon