हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे आग लागल्याची घटना घडली.
शेतकरी लक्ष्मण लिंबाजी फोपसे यांच्या घराला ही आग लागली.
या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या आगीत शेतकऱ्याचं मोठे नुकसान झाल्याने क्षणात संसार उघड्यावर आला.
शेतकरी फोपसे यांचे कुटुंब इतरांच्या शेतात मोलमजुरी करुन पोट भरत होते.
आगीच्या दुर्घनेनंतर कुटुंबाने सरकारला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.