पिकांच्या उन्हाळी #लागवड क्षेत्रात यंदा ७.५ टक्क्यांनी वाढ झाली असून गेल्यावर्षीच्या ४४.२४ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा २५ मार्च २०२२ पर्यंत देशात ४७.५७ लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आलीय. यातील ९.५४ लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या गेल्या आठवड्यात झाल्याचं सरकारी आकडेवारीवरून समोर आलंय. यंदा कडधान्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढलं आहे. गेल्या वर्षीच्या ५.२७ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा ७.४८ लाख हेक्टर क्षेत्रात #कडधान्य लागवड करण्यात आलीय. त्यातही #मूग आणि उडीद लागवडीत प्रमाण वाढलंय.<br />#grains, #sugarcane, #rice, #agri, #agriculture, #agrinews,