Surprise Me!

पुणेकरांची 1 ते 4 वामकुक्षी वेळ; पण भर उन्हात घुमतात परमेश्वराच्या बासरीचे सूर

2022-04-02 0 Dailymotion

पुण्यात आधी उन्हाचा कडाका. आणि त्यात 1 ते 4 ची वेळ म्हटलं की पुणेकरांची वामकुक्षी.टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता. पण याच वेळेत पुणेकरांच्या कानावर सुमधुर आणि मंत्रमुग्ध करणारे बासरीचे सूर पडतात. आणि हे बासरीचे सूर आहेत परमेश्वराचे. परमेश्वर म्हणजे 65 वर्षीय एक आजोबा. परमेश्वर शिंदे अस त्यांच नाव..ते मूळचे माढा तालुक्यातील... लहानपणापासुनच गुर चारण्यासाठी डोंगरात वणवण फिरणं व्हायचं... एकटं गुरामाग काय करायचं ? म्हणून वयाच्या पाचव्या वर्षी बासरी हातात घेतली अन् त्यांचा सुरमयी प्रवास सुरु झाला...

Buy Now on CodeCanyon