Surprise Me!

'अक्कल दाढ इतक्या उशीरा कशी येते?'; राऊतांची राज ठाकरेंवर खोचट टीका

2022-04-03 686 Dailymotion

आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते. हे बघावं लागेल. अडीच वर्षानंतर राज ठाकरे बोलताहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत आज बोलत होते. संजय राऊत म्हणाले, भाजप-शिवसेनेत काय झालं. हे आम्ही बघू. यात तिसऱ्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचं बघा. शिवाजी पार्कवर काल भारतीय जनता पक्षाचाच लाऊडस्पीकर वाजत होता. भाजपचंच हे स्क्रीप्ट होतं, असं वाटतं. टाळ्याही भाजपच्याच होत्या. त्यावर जास्त न बोललेलंच राज्याच्या हिताचं राहील. मेट्रोचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री ठाकरे आपलं काम करत आहेत. काल मराठी भाषा भवनाचं उद्घाटन झालं. अशी ऐतिहासिक कार्य मुख्यमंत्र्यांच्या हातून घडत आहेत. बोलायचंच असेल तर त्याच्यावर बोला, असंही संजय राऊत म्हणाले.

Buy Now on CodeCanyon