Surprise Me!

पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून सराफाला लुटले; पोलिसांचा धाक फक्त नावापुरता

2022-04-05 0 Dailymotion

पुण्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. गळ्याला कोयता लावून दोन जणांनी सराफाला लुटल्याचा प्रकार समोर आला. 73 हजारांचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत आहेत. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला. ही घटना लोहगाव परिसरात घडली असून याबाबत पोलिसांत तक्रार दाखलं करण्यात आली आहे. घटना समजताच घटनास्थळी पोलिसांनी लगेच धाव घेतली . हातात कोयते घेऊन रस्त्यावर नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे पुन्हा सक्रिय झालेत का? चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नाही का?...असे अनेक प्रश्न नागरिकांमधून विचारले जातायत

Buy Now on CodeCanyon