Surprise Me!

Nashik : दोन वर्षांनंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला जाणार, वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

2022-06-13 8 Dailymotion

दोन वर्षाच्या खंडानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे. संत निवृत्तीनाथाच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वारकरी मोठ्या संख्येने त्र्यंबकनगरीत दाखल झालेत. सकाळी दहा वाजता निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरापासून पालखी मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन गाव प्रदिक्षणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर गावात असेल. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

Buy Now on CodeCanyon