ओबीसी समर्पित आयोगाच्या कामकाजावर ओबीसी मंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेला बांठिया आयोग ओबीसींची संख्या कमी दाखवत असल्याचा मंत्र्यांचा आरोप आहे. ग्रामीण भागात 40 टक्के तर शहरी भागात 30 ते 35 टक्के ओबीसींची संख्या दाखवत असल्याचा आरोप ओबीसी मंत्र्यांनी केलाय.
