केतकी चितळे प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अडचणीत आलेत. माहिती तंत्रज्ञान कलम ६६ (अ) चा गैरवापर केल्याचे ताशेरे राष्ट्रीय महिला आयोगानं ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेलं हे कलम का लावलं असा सवाल राष्ट्रीय महिला आयोगानं काल सुनावणी दरम्यान विचारला. त्यानंतर राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केतकी चितळे प्रकरणात जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.