एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना दुसरीकडे ताटातली भाजी महाग होणार आहे... कारण मुसळधार पावसात शेतीचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे बाजारात चांगल्या भाज्यांची आवग कमालीची घटलेय... परिणामी भाज्यांचे दर कडाडले आहेत.. किलोमागे भाज्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वधारले आहेत.
