तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन एका बापाने पुरातून वाट काढल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील आज सकाळची ही घटना असून या घटनेने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे.