गौराईच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करण्याची पद्धत आहे. गौरी पूजनाला सकाळी गौरींची पूजा आणि आरती करून बनवलेले फराळ अर्पण केला जातो. नैवेद्यामध्ये आंबड्याची भाजी, कडी, शेंगदाण्याची चटणी, डाळीची चटणी, पापड, भजी, रव्याचे लाडू, शंकरपाळ्या, शेव, करंजी, चकली इ. नैवेद्य दाखवला जातो.1
