पंजाबमधील आम पक्षाच्या तरुण आमदार नरिंदर कौर भराज यांचं लग्न सध्या चर्चेत आहे. ‘आप’च्या सर्वात तरुण आमदार नरिंदर कौर यांनी पक्षाचा कार्यकर्ता मनदीप सिंह लाखेवालशी लग्नगाठ बांधली. दोघांनी पतियाळा येथील रोडेवाल गावातील गुरुद्वारामध्ये ७ ऑक्टोबरला अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं. या लग्नात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानदेखील उपस्थित होते.<br /><br />
