Surprise Me!

अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून का दूर होत्या वर्षा उसगावकर? अभिनेत्रीने केला खुलासा

2022-10-10 2 Dailymotion

८०च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर गेली काही वर्ष मोठ्या पडद्यावर झळकल्या नाहीत. जवळजवळ ८ वर्ष चित्रपटांपासून दूर होत्या. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेर शिवराज' चित्रपटापासून त्यांनी मोठ्या पडद्यावर नवी इनिंग सुरु केली. परंतु गेली काही वर्ष चित्रपटात काम न करण्याचं कारण त्यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'च्या मुलाखतीमध्ये उघड केलं आहे. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'हवाहवाई' चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी आणि संपूर्ण टीमने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'वर हजेरी लावली आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Buy Now on CodeCanyon