रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवलेंनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारेंवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "शिवसेनेनं सुषमा अंधारेंना टीका करण्यासाठीच आणलं आहे. अंधारे काही वर्ष आमच्याही पक्षात होत्या, पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना उपनेतेपद दिलं आहे. सुषमा अंधारे या टीका करण्यात 'एक्सपर्ट' आहेत. टीका करायला हरकत नाही, पण त्यांनी सारखी टीका करू नये."<br /><br />