Surprise Me!

Uddhav Thackeray: 'पंतप्रधान महाराष्ट्राच्या बाजूने काही बोलणार आहेत की नाही?'; ठाकरेंचा सवाल

2022-12-11 0 Dailymotion

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा पक्षबांधणी सुरू केली आहे. आज ठाणे येथे आंबेडकरवादी विचारांच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी संबंधित नेत्यांचं स्वागत केलं.यावेळी ठाकरे म्हणाले, 'एका बाजुला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटला आहे आणि दुसरीकडे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होत आहे. पंतप्रधान महाराष्ट्राच्या बाजूने काही बोलणार आहेत की नाही?' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.<br />

Buy Now on CodeCanyon