माजी मुख्यमंत्री Uddhav Thackerayयांनी आज विधीमंडळ अधिवेशनाला हजेरी लावून कामकाजात सहभाग घेतला. विधानपरिषदेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीवर टीका केली. एका बाजूला शेतकरी उघड्यावर सोडलेला आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत, असे ते म्हणाले.<br />