Surprise Me!

अभिजित बिचुकलेंनी पत्नी अलंकृता बिचुकलेंना करणार मुख्यमंत्री, महाराष्ट्रभर करणार दौरा

2022-12-30 3 Dailymotion

बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी नेहमीच राज्याच्या राजकारणात धक्कादायक विधाने करत स्वतःला राजकीय पटलावर चर्चेत ठेवले आहे. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्यापासून ते थेट राष्ट्रपती होण्याची स्वप्ने देखील पाहिली. आता असेच एक मोठे स्वप्न पाहून त्यांनी स्वतःच्या सौभाग्यवतीलाच राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा विडा हाती उचलला आहे. नुकताच अभिजित बिचुकले यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्त त्यांनी आपल्या अर्धांगिनी अलंकृता बिचुकले यांना जाहीर पत्र लिहून आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. त्यांच्या या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून त्यांनी उचलेला महिला सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Buy Now on CodeCanyon