‘चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता‘; सत्यजित तांबेंवर शरद पवारांची प्रतिक्रिया<br /><br />‘नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत काँग्रेसशी चर्चा झाली नाही. काँग्रेसमध्ये बसुनच हे हाताळायला हवे होते. बाळासाहेब थोरात टोकाची भुमिका घेत नाही. चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता‘ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.