Bharat Jodo Yatra:राहुल गांधींच्या भारत जोडोमध्ये Sanjay Raut सहभागी; जम्मूमध्ये जाऊन दिला पाठिंबा <br /><br />शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. जम्मूतील कठुआ येथून आज भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली. यात्रेत सामील होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हणाले की, 'काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे ज्याचा देशभरात व्यापक प्रसार आहे. देशभरात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला लोकांमध्ये स्वीकाराची भावना आहे. मी राहुलकडे आवाज उठवणारा नेता म्हणून पाहतो'