पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात पिंपरी चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी आणि कसबा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीने लढवावा, असं आमचं मत असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.<br /><br />#SanjayRaut #PuneBypollElections #Shivsena #MVA #MahavikasAghadi #BJP #PimpariChinchwad #Kasba #Politics #PuneNews #Mumbai #Maharashtra