Surprise Me!

Chinchwad bypoll: 'अशा वेळी भाजपाची सहानुभूती कुठे गेली?' राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा सवाल

2023-01-31 1 Dailymotion

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये चुरस लागल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादीने भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे मृत्यूशी झुंज देत होते. तेव्हा, तीन महिन्यापासून भाजपा चिंचवड पोटनिवडणुकीची तयारी करत होते. असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवण्यावर कार्यकर्ते ठाम असून तशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Buy Now on CodeCanyon