Kasaba Peth पोटनिवडणुकीसाठी भाजपाने पुणे मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर भाजपा नेते व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.<br />तसंच निवडणूक बिनविरोध करण्याचा देखील प्रयत्न करणार असंही ते म्हणाले.<br />