Surprise Me!

Bawankule on Thorat: 'भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर..'; थोरातांवर बावनकुळेंचे वक्तव्य

2023-02-07 1 Dailymotion

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेवर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. थोरात हे नाना पटोले यांच्यावर नाराज आहेत, अशीही चर्चा आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून त्यांनी कळवले आहे. या विषयावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “कुणालाही भाजपात यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत.” आज पत्रकार परिषदेत बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केले.<br />

Buy Now on CodeCanyon