Surprise Me!

लवकरच पक्षप्रवेश करणार; हणमंत जगदाळे यांची पत्रकार परिषदेत माहिती

2023-02-10 9 Dailymotion

ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह चार माजी नगरसेवक तसेच दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. त्यांच्यासोबत विभागातील काही पदाधिकारी देखील पक्षप्रवेश करणार आहेत. जगदाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केलं असून लोकमान्यनगर भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Buy Now on CodeCanyon