'महापुरुषांचा अवमान केला तरी भाजपा...'; Jayant Patil यांची राज्यपालांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका <br /><br />'राज्यपाल भगतसिंग कोशारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करत होते. तसेच, कोशारी यांची महाराष्ट्र विरोधी भूमिका होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांचा भाजपाने कधी निषेध केला नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंचा अपमान केला तरी भाजपा गप्प होती. त्यांना हा अवमान कदाचित मान्य असेल. शेवटी राज्यपाल यांनीच सांगितलं मला जायचं आहे. मग त्यांना बदलण्यात आले आणि आता नवीन राजपाल येत आहेत' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी दिली. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.