उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना शरद पवारांचं नाव घेतल्यानंतर एकच वादंग सुरू झाला आहे.<br />राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणी भाष्य करत यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीच्या <br />तोंडावर भाजपा अशी राजकीय विधानं करत आहे. काही झालं तरी राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, या फडणवीस यांच्या <br />विधानाची देखील रोहित पवारांनी आठवण करून दिली.