राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप कायम असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. <br />यावरून प्राध्यापक व ज्येष्ठ इतिहास संशोधक हरी नरके यांनी भाष्य केलं आहे. निवडणुका वेळेवर घेणं हे घटनात्मक बंधन आहे. <br />मात्र, राजकीय परिस्थिती आपल्याला सोयीची व्हावी यासाठी हे सर्व प्रयत्न आहेत, असं म्हणत हरी नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.<br />