संजय राऊत यांनी मागीतलेल्या सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'हे पत्र सुरक्षा मागण्यासाठी आहे की सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे,हा प्रश्न आहे. सुरक्षा विषय राजकारण विषयी जोडणं चुकीचं आहे, कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करणं चुकीचं आहे. कोणालाही असुरक्षितता वाटली आहे, का याच तपास करण्यासाठी आपल्याकडे कमिटी आहे. त्यांना आवश्यक असेल तर सुरक्षा पुरवली जाईल. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. 'राऊत यांना प्रसिद्धीची सवय आहे,चुकीचे आरोप लावले तर लोक त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी कोणीतरी करतील,ते बिनडोक आरोप करत असतात' असा टोलाही त्यांनी यावेळी राऊतांना लगावला. <br />