Prajakta Mali: 'लग्न करणं गरजेचं आहे का?'; प्राजक्ताच्या प्रश्नावर Sri Sri Ravi Shankar म्हणाले.. <br /><br />मराठी मालिका, वेबसीरिज, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. महाशिवरात्रीनिमित्त काही दिवस प्राजक्ता श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात गेली. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. आश्रमात बसून तिने जप केला. तिच्यासाठी हा अनुभव आनंदीदायी होता. या आश्रमातीलच प्राजक्ताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.