भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले की "देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याचा छंद लागला आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि सध्याचे फडणवीस यांच्यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही", अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.<br /><br />#SanjayRaut #DevendraFadnavis #UddhavThackeray #Shivsena #BJP #SharadPawar #Alliance #Politics #EknathShinde #MahavikasAghadi #Maharashtra <br /><br />