Vikhe Patil on Balasaheb Thorat: 'मुंगेरीलाल के हसीन सपने’ म्हणत विखे पाटलांची थोरातांवर सडकून टीका<br /><br />भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली आहे. “२०२४ मध्ये शिंदे-फडणवीसांविरोधात जनमत जाईल,” या थोरातांच्या वक्तव्यावर बोलताना विखेंनी “त्यांनी आधी नाशिकमधील मविआ उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी,” असा टोला लगावला. ते सोलापूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते