Surprise Me!

Satyajeet Tambe: 'माझा यशाचा बाप एकच आहे...'; पदवीधर निवडणुकीच्या विजयानंतर सत्यजित तांबेंचे विधान

2023-03-05 1 Dailymotion

नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे निवडून आल्यानंतर चोपडा तालुक्यात प्रथमच आले. महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालयाचे स्मार्ट हॉल येथे पदवीधर शिक्षकांचे भेट घेण्यासाठी ते आले होते यावेळी त्यांच्या सत्कार संस्थेचे अध्यक्ष व माजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, 'माझ्या यशाचा एकच बाप आहे तो माझा बाप आहे. त्यांनी प्रत्येकाशी संबंध ठेवले कोणाची जात पाहिली नाही. कोणाचा पक्ष पाहिला नाही त्यामुळे मी निवडून आलो बापाच्या आणि मुलाच्या कामाची तुलना होण्याचा फार मोठा इतिहास आहे' असे वक्तव्य यावेळी त्यांनी केली.

Buy Now on CodeCanyon