Nana Patole on BJP: "डाकूला डाकू म्हटलं तरी...; नाना पटोलेंचं भाजपावर टीकास्त्र <br /><br />राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन पुकारलं आहे. महाराष्ट्रातही याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. भाजपा विरोधातलं आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. यावेळी नानांनी गावगुंड मोदी संदर्भात केलेल्या आपल्या विधानाचा दाखला देत भाजपावर निशाणा साधला. चोराला चोर म्हटलं तरी यांनाच लागतं. डाकूला डाकू म्हटलं तरी यांनाच लागतं, अशी टीका त्यांनी केली.
