Surprise Me!

'हू इज धंगेकर' वरुन धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला, "त्यांना माहिती नाही रवींद्र धंगेकर..."

2023-03-28 1 Dailymotion

पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रकल्पाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ही बैठक विशेष अर्थाने चर्चेत राहिली ती म्हणजे कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामुळे या बैठकीत निमंत्रण नसून देखील भाजपाचे नेते गणेश बिडकर बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे त्या बैठकीवर रवींद्र धंगेकर यांनी बहिष्कार टाकत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 'रवींद्र धंगेकर यांनी घरी जेवायला बोलावल तर मी नक्की जाईल' अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली त्याबाबत रवींद्र धंगेकर यांना विचारले असता ते म्हणाले की "ते पहिल्यापासून म्हणतात 'हू इज धंगेकर' पण त्यांना माहिती नाही की रवींद्र धंगेकर कोण आहे" अशा शब्दात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.<br />

Buy Now on CodeCanyon