Surprise Me!

Sanjay Raut: 'त्यांच्या तोंडाला कुलूप..'; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर राऊत आक्रमक

2023-04-11 0 Dailymotion

चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. त्यावरून आता ठाकरे गटाकडून भाजपावर टीकास्र सोडण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यावर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना टीकास्र सोडलं आहे. “आज जो भाजपा सत्तेत आलेला दिसतोय, त्यात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यावेळच्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे बाबरी कांडानंतर लखनौला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर झाले आहेत. त्यातले ते प्रमुख आरोपी आहेत. हे भाजपाच्या नेत्यांना माहिती नाही का? ज्यांना तुम्ही विकत घेतलंय, त्यांच्या तोंडाला कुलूप का लागलंय?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.<br />

Buy Now on CodeCanyon