राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे कार्यकर्त्यांनी अनिल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात ठेका धरला. यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या देखील या आनंदोत्सवात सहभागी झाल्या होत्या.
