दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना ईडी ने अटक केल्यानंतर या अटकेच्या निषेधार्थ अकोल्यात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेय...केजरीवाल यांना इडी कडून अनेकदा समन्स पाठवण्यात आले होते मात्र ते अनुपस्थित राहिल्याने ही कारवाई करण्यात आलीय..अकोला शहरातील बस स्थानक चौकात <br />आज दिनांक 22 मार्च रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी आप चे जिल्हाध्यक्ष कैलास प्रांजळे ,महानगर अध्यक्ष मकसूद अहेमद खान, यांच्या नेतृत्वात नवीन बसस्थानक चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली , तर यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली यावेळी आपच्या सोबत काँग्रेसचे<br />डॉ प्रशांत वानखडे,साजिद खान पठाण, अशोक अमानकर सहभागी होते.
