Surprise Me!

शक्ती दुबे यांनी यूपीएससी परीक्षेत सर्वप्रथम क्रमांक कसा मिळविला, पहा त्यांची खास मुलाखत

2025-04-22 11 Dailymotion

<p>नवी दिल्ली- UPSC Topper Shakti Dubey: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेचा आज निकाल लागला. या परीक्षेत देशात सर्वप्रथम आलेल्या शक्ती दुबे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना यशाचं रहस्य सांगितलं.  त्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहेत. त्यांनी सांगितलं, मी परीक्षेसाठी खूप मेहनत केली आहे. यश मिळाल्याचं घरी सांगितल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी आहेत. सुरुवातीला मिळालेल्या यशावर विश्वास ठेवणं कठीण होतं. पण,  माझ्या भावानं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवेन, असा अंदाज केला होता. ईटीव्ही भारतचे ब्युरो चीफ आशुतोष झा यांनी शक्ती दुबे यांच्याशी खास बातचीत केली. शक्ती दुबे यांनी परीक्षेची कशी तयारी केली?  त्यांच्या भविष्यातील योजना काय आहेत ते जाणून घेऊ. </p>

Buy Now on CodeCanyon