Surprise Me!

सर्वच भारतीयांनी काश्मीरसोबत उभं राहावं; पाहा काय म्हणाले स्थानिक काश्मिरी लोक

2025-04-23 38 Dailymotion

<p>पुणे : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यात 26 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपास 356 पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. एक ते दोन दिवसांत सर्व पर्यटकांना शासनाच्या माध्यमातून परत आणण्यात येणार आहे. सोमवारपेठ इथं राहणारे युवराज घोले हे 75 लोकांसोबत अडकले आहेत. यावेळी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. यावेळी तिथल्या स्थानिक काश्मिरी नागरिकांनीही संवाद साधला. "आम्ही या घटनेचा निषेध करतो, तसंच सध्या परिस्थिती खूपच बिकट असून काय करावं, काय करू नये, काहीच सुचत नाहीये. या घटनेने काश्मीरमधील पर्यटन 20 वर्ष मागं गेलय. सर्वच भारतीयांना आवाहन आहे की, आमच्या सोबत उभे राहा. आम्ही आश्वासन देतो की, आता यापुढं अशा घटना होणार नाहीत." या अडकलेल्या पर्यटक तसंच स्थानिक नागरिकांशी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी संवाद साधला.</p>

Buy Now on CodeCanyon