Surprise Me!

राज्यात लपून बसलेल्या पाकिस्तान्यांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील : उपमुख्यमंत्री शिंदे

2025-04-27 16 Dailymotion

<p>बुलढाणा : "पाकिस्तान्यांनी तात्काळ देश आणि महाराष्ट्र सोडावा असं फर्मान सरकारनं काढलं आहे. पाकिस्तानला दया-माया दाखवण्याची गरज नाही. जे आश्रय देतील, त्यांनादेखील सोडणार नाही.  संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्य संदर्भात मी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या पोलिसांच्या बाबतीत  काही तक्रारी असतील तर, त्या मुख्यमंत्री आणि माझ्याकडे सांगाव्यात. त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. परंतु काही पोलिसांमुळं, पोलीस दलाला दोषी म्हणता येणार नाही.  आम्ही वर्दीचा सन्मान करणारी लोक आहोत. महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या विधानाबाबत संजय गायकवाड यांना समज दिली आहे. संजय गायकवाड यांनी त्या विधानाबाबत दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे. महाराष्ट्र पोलीस आपल्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात असतात. त्यांचा सन्मान केला पाहिजे. आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाची दखल घेतली आहे," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.</p>

Buy Now on CodeCanyon